Thursday, February 11, 2016

आप्पे चाट

आपल्यापैकी अनेकांच्या घरी आप्पे हा प्रकार होत असेल. आप्पे हे मुख्यत्वे रव्याचे किंवा मिश्र डाळींचे बनवले जातात. काहीजण हे आप्पे गूळ घालून गोड बनवतात तर काहीजण तिखट. मी या आप्प्याचं रूप थोडं पालटायचा प्रयत्न केला; आणि बनवलं, आप्पे चाट.

साहित्यः

आप्प्यांसाठी
एक वाटी चणाडाळ
अर्धी वाटी मूगडाळ
पाव वाटी उडीद डाळ
एक इंच आलं, दोन मिरच्या, व तीन ते चार लसणीच्या पाकळ्या
दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
चवीनुसार मीठ

चाटसाठी
गोड चटणी (जी शेवपुरीला बनवतो तीच)
पुदीन्याची चटणी (तिखट)
शेव
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

- सर्व डाळी एकत्र करून धुवून घ्याव्यात व त्यात साधारण दुप्पट पाणी घालून रात्रभर भिजत ठेवाव्यात
- दुसर्‍या दिवशी सकाळी त्या डाळी व आलं, लसूण, मिरच्या एकत्रित मिक्सरवर वाटून घ्यावे
- मिश्रण साधारण इडली पिठापेक्षा घट्ट ठेवावे
- त्यात चवीनुसार मीठ व चिरलेला बारीक कांदा घालावा
- शक्य असल्यास तासभर हे मिश्रण असेच ठेवावे ज्यामुळे आप्पे हलके होतात व छान फुगतात. सोड्याची गरज लागत नाही
- आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्यात तेल सोडावे
- गरम झाल्यावर त्यात हे मिश्रण चमच्याने घालावे व वरून झाकण ठेवावे
- अंदाजाने काही वेळाने आप्पे उलटावेत. उलटलेली बाजू सोनेरी रंगाची दिसायला हवी.
- याचप्रमाणे दुसरी बाजू सोनेरी झाली की आप्पे काढून घ्यावेत.आप्पे तर रेडी झाले. आता चाट करताना:

- एका बाऊलमधे दोन ते तीन आप्पे कुस्करावेत.
- त्यावर दोनही चटण्या मुबलकपणे घालाव्यात
- वरून शेव कोथिंबीर पेरावी व चाटमसाला भुरभुरवावा
- आवडत असल्यास डाळिंबाचे दाणेही घालता येतातआप्पे चाट ताव मारण्यास तयार आहे !

बाकी या पदार्थाचा जो मी स्टॉल लावला होता एका प्रदर्शनात, त्याचा अनुभव फारच छान होता. लोकांचा प्रतिसाद एकदम भारावून टाकणारा मिळाला.

Friday, June 5, 2015

वांग्याचे काप/ Brinjal Flippers

अतिशय tasty असा हा वांग्याचा प्रकार. मुळात वांगे न आवडणार्यांना देखील आवडेल अशी हि recipe. अगदी  पोळी बरोबर अथवा starter म्हणून नक्की hit आहे.

साहित्य:
१. एक लांबट जांभळे वांगे
२. चणा डाळीचे पीठ ४ मोठे चमचे 
३. १ मोठा चमचा रवा 
४. हळद, तिखट, मीठ स्वादानुसार

कृती:
१. प्रथम वांग्याचे मध्यम जाडीचे काप करावे. सुरीने अथवा काट्याने त्याला दोन्ही बाजूने टोचे मारावेत.
२. एका ताटात चणा डाळीचे पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावे. वांग्याचे काप या पिठात घोळवावेत. हाताने हलकासा दाब द्यावा जेणेकरून पीठ आतपर्यंत शिरेल.
३. आता gas वर तवा तापत ठेवावा. त्यावर थोडे तेल घालून हे काप दोन्ही बाजूने परतून घ्यावेत. झाकण ठेवू नये.

काही महत्वाचे:
१. कापांना पीठ लावून लगेच परतावेत. मध्ये वेळ गेल्यास त्यांना पाणी सुटते व काप मऊ होतात.
२. तिखट आणि मीठ स्वादापेक्षा थोडे जास्त घालावे. म्हणजे कापांना चांगली चव येते.Brinjal flippers

Ingredients:
1. One long purple Brinjal
2. Chickpeas flour 4 Tb Sp
3. 1 Tb Sp Ravaa or Sujee
4. Salt, Turmeric powder, Red chili powder as per taste

Method:
1. Cut the Brinjal into medium thick slices. Now prick the slices with knife or fork.
2. Take the chickpeas flour, Ravaa, salt, turmeric and red chili powder in one dish and mix it nicely. Now flip the Brinjal slices in this mixture. Press slightly to ensure mixture is applied well on both sides.
3. Heat the pan with some oil and shallow fry the slices from both the sides. Fry them without lid.

Important Tips:
1. Immediately shallow fry the slices after flipping them into flour. This will avoid making them soft and you will get crunchy crispy feel.
2. Use little extra salt and chili powder than your regular quantity. This will help to make the flippers tasty.Tuesday, March 17, 2015

रवा केक / Rawa Pan Cake

 <Scroll down for the recipe in English>

रवा केक
साहित्य:
१ वाटी रवा
३/४ वाटी दूध
३/४ वाटी ताक (आंबट नको)
३/४ वाटी साखर
१/२ वाटी पातळ तूप
१ tbsp बेसन
१/४ tsp बेकिंग सोडा
२ थेंब vanilla essence

कृती:
१) प्रथम एका पातेल्यात तूप घेऊन त्यात रवा आणि बेसन घालावे.
२) आता यामध्ये साखर,दूध आणि ताक घालून सर्व जिन्नस छान एकत्र करावेत. हे मिश्रण कमीतकमी ४ तास झाकून ठेवावे. केक सकाळी करायचा असल्यास रात्रभर मिश्रण ठेवले तरी चालेल.
३) केक करायच्या वेळी non stick भांड्याला ला तुपाचा हात लावावा. साधारण झाकण असणारे पसरट पण खोलगट भांडे यासाठी वापरावे.
४) केक च्या मिश्रणात सोडा आणि vanilla essence घालून ते नीट फेटावे. हे मिश्रण तूप लावलेल्या pan मध्ये ओतावे व कमी आचेवर शिजण्यास ठेवावे.
५) त्यावर झाकण म्हणून तापलेला तवा उलटा ठेवावा म्हणजे केक ला वरून देखील आच मिळेल. साधारण १०-१५ मिनिटांनी तवा काढून बघावे. केक वरून शिजला असल्यास आच बंद करावी आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे भांडे तव्यावर उपडे करावे. जेणेकरून केक चा खालचा भाग वर येईल. गार झाल्यावर त्याचे सुरीने तुकडे करावेत.

काही महत्वाचे:
१) आच कमी ठेवावी. तसेच भांड्याचा तळ जाड असावा.
२) हवे असल्यास मिश्रणात काजू बदाम बेदाणे घालू शकता.
३) हा केक २ दिवस सहज fridge शिवाय बाहेर राहतो.

Rawa Pan Cake

Ingredients:
1 bowl Rawa
3/4 bowl Milk
3/4 bowl Buttermilk (avoid sour buttermilk)
3/4 bowl Sugar
1/2 bowl ghee (Ghee should be at liquid consistency; avoid thickened ghee)
1 Tbsp Besan/chickpea flour
1/4 tsp baking soda and 2 drops of vanilla essence

Method:
1) Take ghee in a large vessel. Add rawa and besan and mix well.
2) Now add milk,buttermilk,sugar and mix all the ingredients well to form a cake batter.
3) Cover it and keep aside at least for 4 hours. In case you want to bake the cake in morning, you can keep it overnight as well.
4) At the time of baking the cake, apply little ghee to a non stick vessel to grease the same. Use nonstick pan with lid for baking the cake.
5) Add baking soda and essence in the batter and whisk it properly. Now pour the batter in the greased pan and keep it on low flame. Heat another flat pan and keep it as a lid on cake vessel.
6) Check after 10-15 minutes. If you find its baked then take it off the flame. Turn the cake upside down on the pan used as lid, as shown in the picture.
7) Cut the cake after it gets cool.

Tips:
1) Avoid sour buttermilk. Keep the heat low while baking the cake and use thick bottomed pan.
2) You can even add cashews, almonds, kismis to cake batter.
3) You can keep this cake outside fridge for 2 days
Saturday, November 22, 2014

बदाम एक्का /Almond Halwa

 <Scroll down for the recipe in English>


खूप दिवसांपासून नवीन पदार्थ करण्याचे डोक्यात घोळत होते. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पदार्थ बनवला आणि झक्कास जमून आला.
त्याला आम्ही नाव दिले बदाम एक्का. हा पदार्थ heavy duty dessert या विभागात मोडेल. तर पाहूया त्याची कृती.

साहित्य: (१० जणांसाठी )
४ वाट्या बदामाची भरड
पाउण वाटी तूप 
पाव वाटी खवा /मावा
दीड वाटी milk powder
सव्वा वाटी साखर
२ वाट्या दूध
२ चमचे वेलची पूड 

कृती:
१. प्रथम बदाम कढई मध्ये किंवा microwave मध्ये हलकेसे भाजून घ्यावेत. गार झाल्यावर mixer वर त्याची जाड भरड करावी.
२. कढई मध्ये तूप गरम करावे व त्यावर बदाम भरड घालून मंद आचेवर भाजावे. भरड खमंग भाजली की त्यात खवा घालावा व ५-७ मिनिटे मिश्रण भाजावे.
३. नंतर या मिश्रणामध्ये milk powder आणि दूध घालून छान एकत्र करून घ्यावे.
४. ३-४ मिनिटांनी त्यात साखर घालावी व मिश्रण ढवळत राहावे.
 ५. सर्वात शेवटी gas बंद करून वेलची पूड घालावी.


बदाम एक्का आस्वाद घेण्यास तयार आहे.

काही महत्वाचे:
१. gas नेहमी मंद आचेवर ठेवावा आणि मिश्रण सतत ढवळत राहावे. नाहीतर ते करपेल.
२. बदाम आणि खवा व्यवस्थित भाजून घ्यावा म्हणजे खमंगपणा येतो.
३. दूध आपल्याला हव्या त्या consistency नुसार कमी जास्त करावे. सैलसर हवी असल्यास दूध थोडे वाढवावे.

Badam Ekka/Halwa

Ingredients (for 10 people):
4 bowls coarsely grounded almonds
¾ bowl ghee
¼ bowl khoya/mawa
1 and 1/2 bowl milk powder
1 and ¼ bowl sugar
2 bowls milk
2 teaspoons cardamom powder
Method:
1.       Roast the almonds on a low flame either in a pan or in a microwave. Grind them coarsely in a mixer after they cool down.
2.       Heat ghee in a pan or wok and add the ground almonds. Stir continuously to keep the mixture from getting burnt at the base. Add khoya and stir for another 5 minutes on low flame
3.       Now add milk powder and milk and keep stirring till the mixture binds well
4.       After 3-4 minutes add sugar and allow it to blend evenly in this mixture.
5.       Finally when the mixture achieves a semi liquid consistency, take it off the flame and add cardamom powder
The dessert is ready to be enjoyed
Important tips:   
1.       Always keep the flame low to avoid burning of the mixture
2.       Roast the badam and khoya nicely. It will enhance the taste of the dish
3.       You can adjust the milk quantity according to the desired consistency of badam halwa
Sunday, March 30, 2014

काजू अक्रोड कतली / Kaju Akhrot Katli

<Scroll down for the recipe in English>

उद्या गुढीपाडवा! नवीन वर्ष नवी आशा नवी सुरुवात. मागच्या गुढीपाडव्याला मी टक्कू हा माझा पाककृती ब्लॉग सुरु केला आणि बघता बघता तो एक वर्षाचा झाला. येत्या वर्षी हा ब्लॉग अजून चविष्ट आणि स्वादिष्ट बनवण्याचा माझा मानस आहे.
हाच मानस समोर ठेवून नवीन वर्षाची सुरुवात आपणासोबत एक नवीन गोड पदार्थ ठेवून करतेय. ही एक हटके प्रकारची कतली आहे. दोन पदार्थांचा बेमालूम संगम मी एका बर्फी मध्ये केला आहे आणि खरंच ते अप्रतिम झालंय. आपल्या सर्वांची आवडती काजू कतली ....

आणि त्याच्या जोडीला अक्रोड हलवा! काय कशी वाटली कल्पना?
काजू कतली आणि अक्रोड हलव्याची प्राथमिक कृती मी rakskitchen आणि archanaskitchen  या blogs वरून घेतली आहे. पण या combination साठी त्यात थोडेफार बदल केले आहेत. साखरेचे प्रमाण दोन्ही कृत्यांमध्ये कमी केले आहे कारण आपण दोन गोड पदार्थ एकत्र करून खाणार आहोत. :P

थोडंसं वेळखाऊ काम आहे खरं, पण खव्व्येगीरीसाठी काय पण! :) नाही का !?

अक्रोड हलवा साहित्य: 
१ वाटी अक्रोडांची भरड आणि २ टे.स्पू. अक्रोडांची बारीक पूड
३/४ कप दूध
३/४ वाटीला थोडी कमी साखर (नुसता हलवा करायचा असेल तर ३/४ कप साखर)
२ टे.स्पू. तूप
१ टी.स्पू. वेलची पूड

कृती :
१. प्रथम जाड पॅन मध्ये तूप घ्यावे आणि त्यावर अक्रोडाची भरड खमंग भाजून घ्यावी. त्यामुळे अक्रोडाचा कच्चट वास निघून जातो.
२. नंतर त्यात दूध घालावे व मिश्रण एकत्र करावे. लगेच त्याला तूप सुटायला लागेल. आता त्यात अक्रोडची बारीक पूड आणि साखर घालावी.
३. हे मिश्रण छान एकत्र झाले कि विस्तव बंद करून त्यात वेलची पूड घालावी आणि मिश्रण थंड होण्यास ठेवावे.
आता काजू कतलीचा नंबर :)

काजू कतली साहित्य:
२ वाट्या काजू
१ सपाट वाटी साखर
१/२ वाटी पाणी
१ टे.स्पू. दूध आणि तूप (मिश्रण मळण्यासाठी)

कृती:
१. काजू मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. चांगली मोकळी पूड होण्यासाठी काजू रूम टेम्परेचर ला असावेत.
२. पाणी आणि साखर एका जाड पॅन मध्ये घ्यावे आणि त्याचा एक तारी पाक करावा. पाकाच्या माहितीसाठी खालील दुव्या वर टिचकी मारा. http://takkuuu.blogspot.in/2013/09/shaahirawabarfi.html
३. पाक झाला की त्यात काजू पूड घालावी व मिश्रण सारखे करावे. आता गॅस ची आच कमी करावी आणि ४-५ मिनिटे मिश्रण सतत हलवत राहावे.
४. पॅन ला मिश्रण लागणार नाही याची काळजी घ्यावी. साधारण मिश्रण एकत्र गोळा झाले कि थोडेसे हातात घेऊन त्याचा छोटा गोल करून बघावा. बोटांना चिकटले नाही कि मिश्रण तयार झाले असे समजावे.

काजू अक्रोड कतली कृती:
आता हे काजू मिश्रण ओट्यावर किंवा मोठ्या ताटामध्ये घ्यावे. तूपाचा आणि दुधाचा हात लावून हे मिश्रण मळावे आणि त्याचे दोन समान गोळे करावेत.
ओट्यावर थोडंसं तूप लावून एका गोळ्याची पोळी लाटावी. त्यावर आता अक्रोड हलवा पसरवावा. एका प्लास्टिक वर किंवा बटर पेपर वर दुसरा गोल लाटून घ्यावा आणि प्लास्टिक उलटे करून दुसरी पोळी अक्रोड हलव्याच्या थरावर ठेवावी. वरून एकदा लाटणे फिरवावे.

आता सुरीने तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. अशा रीतीने आपली काजू अक्रोड कतली खाण्यास सज्ज आहे !Walnut Halwa Ingredients:
1 cup coarsely ground walnuts + 2 tb sp finely ground walnut powder
3/4 cup milk
less than 3/4 cup sugar ( 3/4 cup sugar in case you are making only halwa)
2 tb sp ghee
1 tsp cardamom powder

Method:
1. Add ghee in a thick bottomed pan and roast ground walnut until they become brownish.
2. Now add milk and keep stirring. Immediately you will observe oil around walnut and milk mixture. Now add sugar and walnut powder and keep stirring.
3. after 4-5 minutes, turn off the heat and add cardamom powder and keep the mixture aside to cool.

Kaju Katli/ cashew barfi Ingredients:
2 cups cashews
1 cup sugar leveled (heaped in case you are making only cashew barfi)
1/2 cup water
1 tbsp ghee and milk for kneading

Method:
1. Grind the cashews finely to make a smooth powder, ensure to have the cashews at room temp
2. Take water and sugar in a thick bottomed pan and boil it to make one string sugar syrup. for more details on sugar syrup, click on http://takkuuu.blogspot.in/2013/09/shaahirawabarfi.html
3. Now add cashew powder to the sugar syrup and keep stirring the mixture for 4-5 minutes on low heat.
4. For getting the right consistency, try to make small ball of that mixture. If the mixture doesn't stick to your fingers, its right time to take away from heat.
5. Knead the dough in another dish with help of ghee and milk.

Kaju Akroad Katli method:
1. Make two equal balls of cashew mixture. Apply some ghee on a surface and roll the dough to form a circle. Now apply Akroad halwa on this rolled layer equally. Roll the second ball on another plastic sheet/butter paper. Now turn the sheet upside down and keep the same on Walnut halwa. Remove the sheet and press the layer lightly.
2. Cut these sandwich in your favourite shape and your Cashew Walnut Katli is ready to serve :)

Saturday, January 4, 2014

स्ट्रॉबेरी सेवबा / Strawberry Sevba

      
<Scroll down for the recipe in English>

        स्ट्रॉबेरी सेवबा / Strawberry Sevba

लाल चुटुक गोळे हिरव्या रंगाच्या गोंड़यावर! ओळखा बर मी कोण? अशी लहानपणी ओळख झालेली स्ट्रॉबेरी थंडीची खास ओळख. नाजूक पिवळ्या कणात गुंफलेली लाले लाल स्ट्रॉबेरी महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी फार्म मध्ये जाऊन खाण्यात वेगळीच मजा आहे. नुकतेच mapro च्या फार्म मध्ये फ्रेश स्ट्राबेरी मेलबा चाखले. ती अप्रतिम चव जीभेवर रेंगाळत असतानाच सुचले त्याचे variation. ताबडतोब try केले आणि एक hit dish यादीमध्ये add झाली.
स्ट्रॉबेरी लवर्स साठी स्ट्रॉबेरी सेवबा  :)
साहित्य:
५०० ग्रॅम स्ट्रॉबेरीज,
तीन मोठे चमचे शेवया,
तीन चमचे साखर,
एक चमचा तूप,
एक कप पाणी,
एक कप दूध,
दोन वाट्या व्हिप्ड क्रीम,
तीन मोठे चमचे स्ट्रॉबेरी जॅम,
ड्रायफ्रूट्स चे काप

कृती:
१. सर्वप्रथम शेवया, एक चमचा तुपावर हलक्या तांबूस भाजून घ्याव्यात. त्यात एक कप पाणी घालून त्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना त्यात साखर घालावी. हे मिश्रण गार करायला ठेवून द्यावे.
२. स्ट्रॉबेरीज चे अर्धे काप करून फ़्रीज मधे ठेवावेत. व्हिप्ड क्रीम, जॅम आणि दूध एकत्र मिक्सर मधून फिरवून घ्यावे व फ़्रीज मधे सेट होण्यास ठेवावे.
३. सर्व्ह करतेवेळी सर्व पदार्थ फ़्रीजमधून काढावेत. एका ग्लासमधे सर्वात तळाला शेवया घालून त्यावर क्रीम, मधे स्ट्रॉबेरीचे काप, त्यावर पुन्हा क्रीम, आणि सर्वात वरती ड्रायफ्रूट्स चे काप घालून थंडगार सर्व्ह करावे.

Ingredients:
500 gm Strawberries
3 Tb sp Shevai/  rice vermicelli
3 Tb sp Sugar
1 Tb sp Ghee
1 cup Water
1 cup Milk
2 cups whipped cream
3 Tb sp Strawberry Jam
Chopped cashews and almonds

Method:
1. Take ghee in a thick pan and roast the sevai on low flame till they turn into light golden color
2. Add water and sugar and cook well. Once the mixture comes to a boil, turn the flame off and allow it to cool.
3. Cut the strawberries into half and keep them into refrigerator
4. Put whipped cream, milk and jam in a mixer and churn it to make a thick shake. Now keep the light pink shake into refrigerator
5. while serving, put sevai at the bottom of the glass. Add a scoop of whipped cream on it followed by strawberries and whipped cream once again. Garnish with chopped dry fruits and serve chilled. Strawberry Sevba is ready to be relished.

Sunday, November 24, 2013

अळीवाचे लाडू / Garden Cress sweet

<Scroll down for the recipe in English>

थंडीने तिचा गुलाबी रंग दाखवायला सुरुवात केली नाही तर इथे आम्हा खवय्यांची season special list तयार होऊ लागली. अहो काय काय यादी करावी तितकी कमीच. त्यात आवडत्या अळीवाच्या लाडवांचा क्रमांक प्रथम. करायला सोप्पा खायला त्याहून सोप्पा आणि एकदम healthy अशा या लाडवाने यादीची सुरुवात करूया.

साहित्य:
१ वाटी खवलेला नारळ
३/४ वाटी चिरलेला गूळ
१/४ वाटी अळिव
२ छोटे चमचे वेलची पूड

कृती:
१. अळीव नारळाच्या पाण्यात अथवा साध्या पाण्यात ४-५  तास भिजवावेत. साधारण अळीव भिजतील इतके पाणी घालावे व झाकून ठेवावे.
२. भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करावे व मंद आचेवर शिजण्यास ठेवावे. अधे मधे ढवळावे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही.
३. सर्व मिश्रण छान एकजीव झाले कि गॅस बंद करावा.
४. गार झालेल्या मिश्रणामध्ये वेलची पूड घालावी व त्याचे लाडू वळावेत.

काही महत्वाचे:
गुळाच्या गोडीनुसार त्याचे प्रमाण कमी जास्त करावे.


Ingredients:
1 cup grated coconut
3/4 cup chopped jaggery
1/4 cup aleev or garden cress seeds
2 tsp cardamom powder

Method:
1. Soak the garden cress seeds for 4-5 hours in coconut water or normal water. the water should be filled till a level just above the seeds. Cover it with a lid.
2. Now the seeds will be double in size. Mix the soaked garden cress seeds with jaggery and coconut.
3. Put the mixure on low flame. Stir in at regular intervals so as to avoid it from getting burnt.
4. After the ingredients of the mixture blend with each other well, get the mixture off the flame and allow it to cool.
5. Add cardamom powder and shape into small balls called as laddus.

Important:
please check the sweetness of jaggery which you have, and adjust the quantity accordingly.